रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : देशात शहराचे नाव बदलणार आहे. मेरठ शहराचं(Meerut city) नाव बदलून नथुराम गोडसे नगर(Nathuram Godse Nagar ) असं केलं जाणार जाणार आहे. हिंदू महासभेनं याबाबतची घोषणा केली आहे. या घोषणेमुळेनव्या वादाला तोंड फुटणार आहे. हिंदू महासभा  मेरठ महापालिका निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे.  हिंदू महासभेनं(Hindu Mahasabha) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात नाव बदल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अखिल भारत हिंदू महासभेने मेरठ महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केले आहे. जर, हिंदू महासभेचा महापौर झाला तर मेरठचे नाव नथुराम गोडसे नगर असे केले जाईल, अशी घोषणा हिंदू महासभेनं केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू महासभेनं जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात देशाला हिंदू राष्ट्र बनवणे हे प्रधान्य असल्याचं स्पष्ट केले. तर, शिवसेनेवरही हिंदू महासभेनं जोरदार टिका केली आहे. मुस्लिम मतांसाठी शिवसेना तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेनं केला आहे.


या वर्षाअखेर मेरठ महापालिका निवडणुक होणार आहेत. या निवडणुकीत हिंदू महासभा नगरसेवक पदासाठी उमेदवार उतरवणार आहे. जर मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आले आणि महापौरपद मिळाले तर मात्र मेरठचे नाव बदलून नथुराम गोडसे नगर केले जाणार असल्याचा दावा हिंदू महासभेनं केला आहे.  यासोबतच शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मुस्लिम नावांना बदलून हिंदू महापुरुषांची नावे ठेवण्यात येणार असल्याचेही हिंदू महासभेनं जाहीर नाम्यात म्हंटले आहे.


पूर्वी भारतीय जनता पक्ष स्वतःला हिंदू पक्ष म्हणवत असे, पण आज इतर समाजातील लोकांचाही वरचष्मा आहे. त्याचप्रमाणे शिवसेनाही मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेचे उपाध्यक्ष पंडीत अशोक शर्मा यांनी केला.


काय आहे हिंदू महासभेच्या जाहीरनाम्यात?


  1. भारताला हिंदू राष्ट्र बनवणे ही पहिली प्राथमिकता.

  2. गाईची काळजी घेण्यास प्राधान्य

  3. भारतातील धर्मांतरासारख्या मुद्द्यांवर काम करणार

  4. वाढत्या इस्लामी तुष्टीकरणाच्या विरोधात पावले उचलणार.