Meghalaya Results: मेघालयात काँग्रेसची वाईट स्थिती, TMC भाजपाला देऊ शकतं धक्का; जाणून घ्या सत्तेचं समीकरण
Meghalaya Results: मेघालयात (Meghalaya) त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एनपीपी (NPP) 25 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसने (Congress) 11 ते 12 जागा जिंकल्यास युतीची गणितं बदलण्याची शक्यता असून भाजपाची (BJP) चिंता वाढू शकते.
Meghalaya Results 2023: मेघालायत (Meghalaya) सुरुवातीचे कल हाती आले आहेत त्यानुसार त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये एनपीपी (NPP) 25 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. दुसरीकडे भाजपा (BJP) मात्र फक्त 6 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसची (TMC) कामगिरी भाजपाची (BJP) चिंता वाढवणारी ठरु शकते. याच कारणास्तव आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Assam CM Hemant Biswa Sarma) यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा (Meghalaya Chief Minister Conrad Sangma) यांची भेट घेतली होती.
सुरुवातीच्या कलांमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत दिसणारा तृणमूल काँग्रेस नंतर मात्र पिछाडीवर पडला. जर टीएमसीने 11 ते 12 जागा जिंकल्या तर संगमा यांच्याकडे भाजपाव्यतिरिक्त पर्याय उपलब्ध आहे. ते भाजपाच्या जागी टीएमसीशी युती करु शकतात. मात्र सरमा भाजपाच्या युतीसाठी प्रयत्नशील असतील.
मेघालयात भाजपा आणि एनपीपी युतीने सरकार चालवत होतं. दरम्यान या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या कलांमध्ये दोन्ही पक्षांना फायदा मिळताना दिसत आहे.
मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळं लढण्याचा निर्णय घेतला होता. स्वतंत्र लढत असल्याने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संगमा आणि सरमा यांची गुवाहाटीमधील एका हॉटेलात गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत संभाव्य युतीची चर्चा झाली आहे.
ईशान्येत सरमा भाजपाचे प्रमुख रणनीतिकार असल्याचं बोललं जातं. 2016 मध्ये काँग्रेसचा परभव करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होत. मेघालयच्या मुख्यमंत्र्यांसह त्यांची बैठक झाल्याने चर्चा रंगली आहे. निवडणुकीनंत युतीची शक्यताही व्यक्त होत आहे.
आसामचे मुख्यमंत्री भाजपाच्या नेतृत्वातील ईशान्य विकास आघाडीचे म्हणजेच NEDA चे प्रमुख आहेत. NEDA ने कोणत्याही स्थितीत काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसशी युती करणार नाही असं आधीच स्पष्ट केलं आहे.