जम्मू : मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती सरकारचा सत्तेत सहभागी असलेल्या भाजपने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यान पीडीपी-भाजपचे सरकार कोसळले. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला. दरम्यान, येथे त्रिशंकु स्थिती असल्याने कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे येथे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जम्मू-काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी' (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांचे युती सरकार राज्यात सत्तेवर होते. मात्र, भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सरकार अल्पमतात आले. त्यामुळे मुफ्ती यांनी राजीनामा देऊन टाकला. 



जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपने घेतला. मात्र, त्याआधी दिल्लीत राजकीय घडामोडी घडल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढत असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भाजप जम्मू-काश्मीरच्या सत्तेतून बाहेर पडत असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राम माधव यांनी सांगितले. या घोषणेनंतर मेहबूबा मुफ्ती यांना भाजपच्या या निर्णयाने धक्का बसला.