`मी पळालो नसून....` मेहुल चोक्सीचा प्रतिज्ञापत्रातून खुलासा
फरारी व्यापारी मेहुल चोकसीने मुंबई उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले.
नवी दिल्ली : फरारी व्यापारी मेहुल चोकसीने मुंबई उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये आपण देश सोडून पळालो नसून आरोग्य तपासणीसाठी देश सोडल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने आपल्या आजाराबद्दल मेडिकल हिस्ट्री देखील सादर केली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार सध्या तो एंटीगुआ येथे राहत आहे. तपासात सहकार्य करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. जर न्यायालयाची संमती असेल तर शोध अधिकारी एंटीगुआ येऊ शकतात. मी त्यांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्याने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे स्पेशल कोर्ट आणि शोध अधिकाऱ्यांसमोर येऊ इच्छितो असेही मेहुल चोक्सीने सांगितले. मेहुल चोक्सी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडी आणि सीबीआयने केला होता. मेहुलने हा आरोप फेटाळून लावला आहे. मी एंटीगुआतून बाहेर जाऊ शकत नाही अशी परिस्थिती असल्याचे तो म्हणाला. पण अधिकारी इथे येऊन माझी चौकशी करु शकतात. मी त्यांना पूर्णपणे सहकार्य करेन असे चोक्सी म्हणाला आहे.