नवी दिल्ली : ऑनलाईन ऑर्डर केली आणि ती मनासारखी आली असं फार कमीवेळा होता. फूड डिलिव्हरीच्या बाबतही अनेक घोळ झाल्याचं समोर आलं आहे. मात्र आता एक असा गोंधळ झाला की ज्याने हसावं की रडावं हा मोठा प्रश्न पडला आहे. एका तरुणाने रेस्टॉरंटमधून एक पदार्थ ऑर्डर केला. त्याबदल्यात त्याला जे मिळालं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तरुणाला नेमकं आपण काय करावं हेच समजलं नाही. त्याने सोशल मीडियावर त्याची कहाणी सांगितली आहे. त्यानंतर काही युजर्सनी हसण्यावरी घेतलं तर काही युजर्सनी रेस्टॉरंटबद्दल नाराजी व्यक्त केली. 


तरुणाने रेस्टॉरंटमधून ओनियन रिंक ऑर्डर केल्या होत्या. त्या बदल्यात त्याला कांद्याच्या गोल कापलेल्या रिंग पार्सलमधून घरी आल्या. ओनियन रिंग या डिश ऐवजी कदाचित त्याचा शब्दश: अर्थ त्याने घेतला असावा. हा प्रकार पाहून एक पॉईंटला हसू आवरणार नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


दिल्लीत राहणाऱ्या उबैदुने एका रेस्टॉरंटमधून ओनियन रिंग ऑर्डर केले होते. त्या ऐवजी त्याला त्याला कापलेला कांदा देण्यात आला. हा तरुण आता कापलेला कांद्याच्या रिंग करून आपल्या बोटात घालून खेळताना दिसत आहे. 


या तरुणाच्या व्हिडीओला काही तासांत लाखो लाईक्स मिळाल्या. काहींनी या व्हिडीओवर हसण्याच्या कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by UbaidU (@ubaidu_15)