नवी दिल्ली : आशियातलं सर्वात पहिलं चर्च कुठे अस्तित्त्वात आलं, हे तुम्हाला ठाऊक आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय ख्याती असणारी पर्यटक नगरी 'नैनीताल'ला ऐतिहासिक महत्त्व आहे. या शहरात असणारं ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा आणि चर्च या जागेला आणखीनच सुंदर बनवतात. 


सरोवर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैनितालमध्ये मॅथोडिस्ट चर्च, सेंट जोन्स, सेंट फ्रान्सिस कॅथलिक चर्च, सेंट निकोलस असे काही चर्चेस आहेत... पण, यामध्ये सर्वात चर्चेतील चर्च म्हणजे माल रोड स्थित मॅथोडिस्ट चर्च... त्याचं कारणही तसंच खास आहे... हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण 'आशियातील पहिलं चर्च' म्हणून ओळखलं जातं. 


मॅथोडिस्ट मिशनरीचे विल्यम बटलर १० मे १८८५ रोजी भारतात दाखल झाले होते. या दरम्यान त्यांनी अलाहाबाद, दिल्ली तसंच जवळपासच्या शहरांत मॅथोडिस्ट धर्माचा प्रचार - प्रसार केला. त्यानंतर ते बरेलीमध्ये स्थानांतरित झाले. १८८५ च्या उठावादरम्यान बरेलीचे कमांडर निकलसन यांनी बटलर यांना सुरक्षेच्या दृष्टीने नैनीताल जाण्याचा सल्ला दिला. 


२२ सप्टेंबर १८५९ रोजी विल्यम बटलर नैनीतालला दाखल झाले. १८५९ साली मल्लीताल रिक्षा स्टँडजवळ बटलर यांनी मॅथॉडिस्ट चर्चचा पाया रचला. १८७० मध्ये हे चर्च बांधून तयार झालं. त्याच वर्षीपासून इथं ख्रिसमसच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली.