नवी दिल्ली: सध्या देशभरात गाजत असलेल्या #MeToo मोहिमेचा फटका परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री एम.जे. अकबर यांना बसला आहे. केंद्र सरकारने त्यांना त्यांचा नायजेरिया दौरा आटोपता घेत गुरुवारपर्यंत भारतात परतण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वी सहा महिला पत्रकारांनी एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एका महिला पत्रकाराने खुलासा करत मुंबईतील एका हॉटेलमध्ये अकबर यांच्याशी झालेल्या भेटीबाबतचा अनुभव सांगितला आहे. अकबर हे हॉटेलच्या रुममध्ये मुलाखती घ्यायचे आणि दारु पिण्यासाठीही ऑफर करायचे. फोनवर बोलताना घाणेरड्या भाषेचा वापर, अश्लिल मॅसेज पाठवणे आणि असभ्य कमेंट करणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.


एम.जे. अकबर नायजेरिया दौऱ्यावरून शुक्रवारी परतरणार होते. पण या आरोपांनंतर त्यांना हा दौरा आटोपता घ्यावा लागला आहे. या संपूर्ण प्रकरणावर सरकार आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. पण अकबर यांचे स्पष्टीकरणही या प्रकरणी महत्त्वाचे आहे. यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. आम्हाला घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने पंतप्रधान मोदींसाठी हे प्रकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे याकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. काही तक्रारी गंभीर स्वरुपाच्या आहेत, त्यावर विचार केला जात आहे. तसेच पत्रकारांमध्ये अकबर यांच्याविरोधात बनत असलेले मत पक्षासाठी चिंतेचा विषय असल्याचे एका नेत्याने सांगितले.