सिंगल चार्जवर 461 km पर्यंत धावणारी दमदार कार! खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
MG Motor India ने 7 मार्च रोजी 2022 मॉडेल ZS EV Electric SUV लाँच केली. या कारला ग्राहकांची इतकी पसंती मिळतेय की मार्चच्या शेवटापर्यंत, कंपनीने 1,500 बुकिंग मिळवल्या आहेत.
नवी दिल्ली: MG Motor India ने अधिकृतपणे भारतात 2022 MG ZS EV लाँच केली. कारची सुरूवातीची एक्स-शोरूम किंमत 21.99 लाख रुपये आहे. ही किंमत इलेक्ट्रिक SUV च्या बेस एक्साईट व्हेरियंटसाठी आहे. जी जुलै 2022 पासून ग्राहकांना उपलब्ध होईल. आतापासून उपलब्ध केलेल्या मॉडेलचे नाव एक्सक्लुझिव्ह आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 25.88 लाख रुपये आहे.
7 मार्च रोजी लाँच झालेल्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी कंपनीने गेल्या महिन्यात 1,500 बुकिंग मिळवल्या आहेत. ही इलेक्ट्रिक कार भारतात प्रथमच 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली होती, आता कंपनीने मोठ्या बदलांसह ती पुन्हा बाजारात आणली आहे.
एलईडी लाईट्स
2022 MG ZS EV ला पुन्हा डिझाईन केलेला फ्रंट देण्यात आला आहे. त्यामुळे कारचा लुक स्टाइलिश बनतो. इलेक्ट्रिक एसयूव्हीला 17-इंचाचे टॉमाहॉक हब डिझाइन अलॉय व्हील देण्यात आले आहेत. याशिवाय कारमध्ये सर्वत्र एलईडी लाईट्स देण्यात आले आहेत.
प्रीमियम लेदरने कव्हर्ड डॅशबोर्ड
SUV ला प्रीमियम लेदर कव्हर डॅशबोर्ड, ड्युअल-पेन पॅनोरामिक स्काय रूफ, रिअर सेंटर हेडरेस्ट, कप होल्डर्ससह रिअर सेंटर आर्मरेस्ट आणि मागील एसी व्हेंट्सची सुविधा आहे.
केबिनमध्ये 10.1-इंचाची एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम असून, ती Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. कंपनीने येथे 7-इंचाचा LCD ड्रायव्हर्स डिस्प्ले, 5 USB पोर्ट, वायरलेस फोन चार्जिंग, एअर फिल्टर, डिजिटल ब्लूटूथ की यांसारखे अनेक फीचर्स दिले आहेत.
सिंगल चार्जमध्ये 461 KM रेंज
MG India ने या इलेक्ट्रिक SUV ला 50.3 kWh चा बॅटरी पॅक दिला आहे. जो IP69 वॉटरप्रूफ रेटिंग आहे. SUV आता एका चार्जवर 461 KM प्रवास करू शकते. ही कार 0-100 किमी/ताशी वेग घेण्यासाठी फक्त 8.5 सेकंद घेते.
सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही इलेक्ट्रिक एसयूव्ही मजबूत आहे, ज्यामध्ये 6 एअरबॅग्ज, iSmart कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय लेन चेंज असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, 360-डिग्री कॅमेरा, हिल डिसेंट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांचा समावेश आहे.