Home Ministry Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे. येथे सिनीअर रिसेप्शिन  ऑफिसर आणि ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. एमएच भरती 2024 अंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत.  यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. 


गृह मंत्रालय नोकरी पात्रता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मूळ कॅडर किंवा विभागात रेग्युलर बेसिसवर नोकरीचा अनुभव असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे मॅट्रीक्समध्ये लेवल 3  (21700-69100)  मध्ये किमान 5 वर्षे नियमित सेवा पूर्ण केल्याचा अनुभव असावा. 


सिनीअर रिसेप्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतील पदवी असावी. तसेच रिसेप्शन ड्युटी संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा.


गृह मंत्रालय भरती 2024 अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या फॉर्मेटमध्ये अर्ज करावा. सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. ही महत्वाची कागदपत्रे  उप सचिव (एसएसओ), गृह मंत्रालय, रुम नंबर 01, तिसरा मजला, एनडीसीसी-II, बिल्डिंग, नवी दिल्ली, या पत्त्यावर पाठवायची आहेत.


गृह मंत्रालय भरती 2024 अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पे स्केल दिले जाणार आहे. ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल ४ नुसार 25 हजार 500 रुपये ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तर सिनीअर रिसेप्शन ऑफिसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 6 अंतर्गत 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 


अर्जाची शेवटची तारीख


गृह मंत्रालय भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार बातमीत देण्यात आलेला अर्ज तपशील वाचून अर्ज करु शकता. रोजगार समाचारमध्ये जाहीरात आल्याच्या 60 दिवसांच्या आत म्हणजेच 1 मार्च पर्यंत तुम्ही अर्ज करु शकता.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा