नेमका किती रुपये पगार असलेले असतात मध्यमवर्गीय? तुम्ही कशात मोडता? Survey आला समोर
Middle Class in India: एका सर्व्हेनुसार मध्यमवर्गीयांची व्याख्या आणि त्यांचे उत्पन्न सांगण्यात आले आहे.
Middle Class in India: भारतात मध्यमवर्गीयांची संख्या खूप मोठी आहे. मध्यमवर्गीय म्हणजे अशी कुटुंब ज्यांची क्रयशक्ती गरीबांपेक्षा जास्त असते. वाढत्या किमतीमुळे त्यांना घर खरेदी करण्यात अडचणी येतात. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नाचा मोठा भाग लोनवर खर्च होतो. मध्यमवर्गीय कुटुंबात अनेक प्रकारच्या समस्या असतात, अशा अनेक व्याख्या मध्यमवर्गीयांबद्दल केल्या जाता. पण मध्यमवर्गीय म्हणजे नेमके कोण? असा प्रश्न विचारल्यावर उत्तर उत्पन्नावर येऊन थांबत. एका सर्व्हेनुसार मध्यमवर्गीयांची व्याख्या आणि त्यांचे उत्पन्न सांगण्यात आले आहे.
मध्यमवर्गीय कोण?
भारतातील बहुतांश लोक मध्यमवर्गीय आहेत. यामागे अनेक कारणे असू शकतात. भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होतेय. विविध क्षेत्रात विकास होतोय.शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. अधिकाधिक लोक उच्च शिक्षण घेत आहेत.सरकारी अनुदाने, रोजगार योजना आणि इतर समृद्धी कार्यक्रम राबवले जात आहेत. दरम्यान यूगोव-मिंट-सीपीआर मिलेनियल च्या सर्वेक्षणात, 88 टक्के लोकांनी स्वतःला मध्यमवर्गीय मानले आहे. दरमहा 50,000 रुपयांपेक्षा कमी कमावणारे देखील स्वतःला मध्यमवर्गीय समजतात. आम्ही मध्यमवर्गीय आहोत, असे या उत्पन्न गटातील साधारण 90 टक्के लोकांना वाटते, असे यूगोव-मिंट-सीपीआर मिलेनियलच्या या सर्वेक्षणात म्हटलंय. दरमहा 4 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्यांपैकी 57 टक्के लोकांनी देखील स्वतःला मध्यमवर्गीय मानले आहे. या मध्यमवर्गाला समजून घेण्यासाठी भारतात आणखी चांगली चौकट आहे का? निश्चित प्रमाणात काम करण्याची गरज आहे.
तीन प्रकारचे भारतीय
ब्लूम व्हेंचर्सच्या मते, भारतीय ग्राहकांना तीन श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते. पहिला: हा श्रीमंत वर्ग आहे. ज्यामध्ये भारतातील सुमारे 3 कोटी कुटुंबांचा म्हणजेच साधारण 12 कोटी लोकांचा समावेश आहे. ज्याचे दरडोई उत्पन्न सुमारे 12.3 लाख रुपये आहे आणि हा देशाचा मुख्य ग्राहक वर्ग आहे.दुसरा वर्ग हा महत्वाकांक्षी वर्ग आहे. ज्यामध्ये 30 कोटी लोकांचा समावेश आहे. ज्यांचे दरडोई उत्पन्न सुमारे 2.5 लाख रुपये आहे. तर तिसरा वर्ग पिरॅमिडच्या खालच्या-तिसऱ्या भागात येतो. हातावर पोट असलेले लोकं यात मोडतात. ज्यांना दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची भ्रांत असते. यात भारतातील बहुसंख्य लोक येतात. ज्यांच्याकडे कर्ज-व्याजाची हमी देणारे कोणतेही उत्पन्न नसते.
विषमता कमी करणे आवश्यक
लोकसंख्या, जागा, पाणी, प्रदूषण अशा अनेक समस्या भारतात आहेत. पण श्रीमंत वर्ग स्वत:ला याच्याशी कमी जोडून घेतो. हा वर्ग संधी मिळताच युरोप किंवा अशा देशांत जाऊ लागले आहेत जिथे परिस्थिती सोयीची आहे. एक विशिष्ट वर्ग या प्रश्नांवर बोलताना दिसत नाही, दुसरीकडे मध्यमवर्गीयांना हे प्रश्न नेहमीच्या आयुष्यात भेडसावतात, त्यामुळे ते सतत या प्रश्नांवर आवाज उठवताना दिसतात, असेही सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. दोन वर्गातील दरी कमी करण्याची आवश्यकताही व्यक्त होत आहे.
कर्मचाऱ्यांची पगारवाढ
बहुतांश मध्यमवर्ग हा नोकरीवर अवलंबून असतो. महिनाअखेर त्यांना एक ठराविक रक्कम पगार म्हणून मिळते, ज्यात त्यांना आधीच्या महिन्याचे खर्च आणि पुढच्या महिन्यातील गरजा भागवायच्या असतात. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि निम्नवर्गीय लोकांना त्यांच्या आवश्यक खर्चात कपात करावी लागते. 2017-18 आणि 2022-23 दरम्यान कामगारांच्या वास्तविक वेतनात दरवर्षी केवळ 0.7 टक्क्यांनी वाढ झाल्याचे ताज्या पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) तून पुढे आली आहे.