कुंभमेळा २०१९ : केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींचं गंगेत शाही स्नान
आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात
प्रयागराज : प्रयागराजमध्ये आस्थेचा विषय असलेल्या कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. जगभरात प्रसिद्ध असलेला कुंभमेळा १५ जानेवारी ते ४ मार्चपर्यंत चालणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या प्रयागराज शहराज हे कुंभमेळ्याचा ४ स्थानांपैकी एक आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी देखील गंगेत डुबकी घेतली. शाही स्नानाला कुंभमेळ्यात मोठं महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हे पहिलं शाही स्नान होतं. शाही स्नानाच्या पहिल्या दिवशी येथे सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्नान घाटावर जवान तैनात आहे. घोड्यावर बसून पोलीस पेट्रोलिंग करत आहेत.
नागा साधुचं स्नान
कुंभमेळ्यात आणखी एका आकर्षण असतं ते म्हणजे नागा साधू. कुंभमेळा एक सामान्य व्यक्तींसाठी एक संधी असते. जे नागा साधुंसोबत या सामाजिक मेळाव्यात सहभागी होतात. हे नागा साधू इतर दिवस हिमालयात तप करत असतात. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
अयोध्येत रोज ३३ हजार दिवे पेटणार
अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर बनवण्यासाठी १५ जानेवारी ते ४ मार्चपर्यंत रोज ३३००० दिवे लावले जाणार आहेत. याशिवाय राम मंदिराच्या निर्माणासाठी ३३००० रुद्राक्षांपासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाणार आहे.