AHMEDABAD News: पती पत्नींमधील नाते संबध अगदी किरकोळ कारणावरुन देखील बिघडत आहेत. यामुळेच अलिकडच्या काळात घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, पती पत्नीमधील या बिघडत्या नाते संबधांचा परिणाम निरागस मुलांवर देखील होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली आहे.  आई वडिलांनी घटस्फोट घेतल्याचा निर्णय पटला नाही. आई वडिलांनी घडस्फोट घेतल्यामुळे 12 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबाद शहरातील अमराईवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.  इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्याने शनिवारी दुपारी आपल्या मावशीच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आई वडिल घटस्फोट घेणार असल्याचे या मुलाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुलाच्या आत्महत्येमुळे कुटुबियांना मोठा धक्का बसला आहे. 


मुलाचे अभ्यासात लक्ष नसल्याची शिक्षकांची तक्रार


मृत मुलाच्या आई वडिलांमध्ये वाद सुरु होता. दोघांनी घटस्फोटाचा घेतला होता. आई वडिलांनी घटस्फोट घेतल्याचा निर्णय या मुलाला पटला नव्हता.  आई वडिलांच्या निर्णयामुळे मुलगा तणावात होता. मागील तीन ते चार महिन्यांपासून त्याचे अभ्यासात देखील लक्ष नव्हते. शाळेतील शिक्षकांनी देखील मुलाचे अभ्यासात लक्ष नसल्याची तक्रार केली होती.
मृत मुलाच्या आई वडिलांनी 2018 मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला होता. ज्यावेळी आई वडिलांचा घडस्फोट झाला तेव्हा हा मुलगा सात वर्षांचा होता आणि त्याची मोठी बहीण 10 वर्षांची होती. तेव्हापासून मुलगा आणि त्याची बहीण आपल्या आजीकडे राहत होते. शेजारीत त्याची आई देखील राहत होती. तो अधून मधून आईच्या घरी राहत असे. 


मुलाने गळफास घेतला


बाहेर खेळायला जातो असे मावशीला सांगून रविवारी हा मुलगा घराबाहेर पडला. मात्र, मुलगा बराचवेळ परत न आल्याने मावशीला काळजी वाटली. यामुळे त्याने मृत मुलाच्या मित्रांकडे चौकशी केली सर्वत्र शोधले. मात्र, मुलगा कुठेच सापडला नाही. अखेरीस मावशीने मुलाच्या आईच्या घरी गेली. यावेळी येथे मावशीला हा मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाला असा अवस्थेत पाहून मावशीला धक्का बसला. मावशीने तातडीने मुलाला रुग्णालायत नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.


मुलगा तणावात असल्याची वडिलांची तक्रार


कौंटुबिक वादामुळे मुलगा तणावाच होता. घटस्फोटाचा निर्णय त्याला पटला नव्हता. याच नैराश्यातून मुलाने आत्महच्या केल्याची तक्रार मृत मुलाच्या वडिलांनी केली आहे.