Gangraped On Minor Girl: अल्पवयीन मुलगी तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत घरातून पळून गेली. त्यानंतर दोघांनी एका हॉटेलमध्ये खोली घेतली. मात्र तिने हॉटेल मॅनेजरने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगाने घाबरलेल्या दोघांनी तिथून पळ काढला. मात्र, त्यानंतर दोघांसोबतही एक भयंकर घटना घडली आहे. त्यामुळं एका चुकीच्या निर्णयामुळं मुलीचे आयुष्य क्षणार्धात उद्ध्व्स्त झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या जोधपुर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रियकरासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तिघा विद्यार्थ्यांनी सामूहिक अत्याचार केला आहे. स्टेशनला सोडण्याच्या बहाण्याने तिघा आरोपींनी दोघांना लिफ्ट देऊ केली. त्यानंतर प्रियकराचे हात-पाय बांधून ठेवले आणि अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. रविवारी ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही अल्पवयीन तरुण-तरुणी घरातून पळून आले होते. शनिवारी रात्री दोघांनी पावटा शहरातील कृष्णा गेस्ट हाऊसमध्ये रुम बुक केली. दोघंही अल्पवयीन असल्याने हॉटेल मॅनेजरने त्यांना वेगवेगळ्या खोल्या दिल्या. त्यानंतर पाणी देण्याच्या बहाण्याने मॅनेजर मुलीच्या खोलीत गेला. तिथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीचा आवाज ऐकून प्रियकर तिथे पोहोचला आणि त्याने मॅनेजरला विरोध केला. त्यानंतर मॅनेजरने दोघांनाही हॉटेलच्या बाहेर काढले. 


मध्यरात्री दोघेही शहरात फिरत होते. त्याचवेळी रस्त्यात त्यांना तिन विद्यार्थी दिसले. त्यांनीही त्यांची मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी मैत्री केली. त्यांना जेवण देऊ केले. त्यानंतर स्टेशनवर सोडतो असं सांगत गाडीत बसवले. त्यांच्यावर विश्वास ठेवून जोडपेही त्यांच्यासोबत जायला तयार झाले. मात्र, घडलं भलतंच. 


स्टेशनकडे जात असताना एका कॉलेजसमोर तिघांनी गाडी थांबवली व जोडप्याला गाडीतून उतरवत कॉलेजच्या मैदानात घेऊन आली. त्यानंतर तिघांनीही प्रियकराला बांधून ठेवले आणि त्यानंतर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि घटनास्थळावरुन फरार झाले. ही घटना रविवारी सकाळी जवळपास 4-5 दरम्यान घडली. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी दोघांना पाहिल्यावर पोलिसांना माहिती दिली. 


माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर जोडप्याला पोलिस स्टेशनला नेऊन त्यांची सविस्तर चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तिघांना अटक केली आहे. तसंच, ज्या गेस्ट हाऊसमध्ये दोघे थांबले होते त्या मॅनेजरलाही पोलिसांनी अटक केली आहे. तर, या प्रकरणात पॉक्सो कायद्याअंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, पोलिसांनी अल्पवयीन मुलीची वैदयकिय चाचणीही केली आहे.