Crime News : भारतामध्ये पबजी या गेमने तरूणाईला वेड लावलं होतं. या गेमसारख्याच असणाऱ्या 'फ्री फायर' गेमच्या मदतीने पोलिसांनी 16 वर्षाच्या मुलीचा शोध घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी हुशारीने बेपत्ता मुलीचा शोध घेत तिला पालकांना सोपवलं आहे. 
 
नेमकं काय घडलं?
14 ऑगस्टला संध्याकाळी 5.30 च्या सुमारास एक महिला आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन पोलिसात जाते. मुलीकडे मोबाईल नसल्यामुळे तिचा शोध घेणं पोलिसांना कठीण होतं. पोलिसांनी मुलगी घरातील जो मोबाईल फोन वापरत होती तो तपासला. त्यावेळी ती फ्री फायर गेम खेळत असल्याचं समजलं. या गेमच्या माध्यमातून ती काही मित्रांना जोडली गेली होती. यातील एका मित्रासोबच ती वडिलांच्या फोनवरून फोन केला होता. त्याचे काही रेकॉर्डिंग मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या विक्रम चौहानसोबत ती संपर्कात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला फोन लावत चौकशी केल्यावर 14 ऑगस्टला मुलीने 5.45 च्या दरम्यान मला एका रिक्षा चालकाच्या मोबाईलवरून फोन कॉल केल्याचं सांगितलं. त्यानंतर मला परत एकदा फोन आल्याचं तो म्हणाला.


दुसरा फोन आला तो नंबर पोलिसांनी स्ट्रेस केला. तो नंबर दिल्लीच्या गुरूद्वारा बंगला साहिब इथल्या सेवादाराच्या असल्याचं समजलं. त्यानंतर लगोलग पोलीस लोकेशनला पोहोचले. तिथे चौकशी केल्यावर त्यांना बेपत्ता मुलगी सापडली. आईसोबत भांडण झालं म्हणून निघून गेल्याचं तिने सांगितलं.