मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर यशस्वी ठरल्यानंतर राजकारणाच्या मैदानावर उतरलेल्या गौतम गंभीरला (Gautam Gambhir) पोस्टरबाजीला (Posters) सामोरे जावं लागलं आहे. भारतीय जनता पक्षाचा खासदार (BJP MP) गौतम गंभीर 'हरवला' (Missing) असल्याची पोस्टर दिल्लीत लावण्यात आले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदूषण नियंत्रणावर 15 नोव्हेंबर रोजी खासदार स्थायी समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजप खासदार आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर उपस्थित राहिला नाही. या विरोधात आपच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे. 



रविवारी (17 नोव्हेंबर) सकाळी आयटीओ परिसरात ठिकठिकाणी गौतम गंभीर 'लापता' असे पोस्टर लावण्यात आले आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. सध्या या पोस्टरबाजीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 



लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिल्लीकरांनी गौतम गंभीरला डोक्यावर घेतलं होतं. मात्र, या पोस्टर लावून त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर झालेल्या बैठकीपासून तो गायब आहे. इंदूरमध्ये जिलेबी आणि पोहे खाताना त्याला अखेरचे पाहण्यात आले. आता त्याचा संपूर्ण दिल्लीत शोध सुरू असल्याच्या आशयाचे पोस्टर्स दिल्लीत लावण्यात आले आहेत.