नवी दिल्ली : भाजपच्या 'मिशन 2019' ला जोरदार सुरूवात झाली आहेत. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर सभेच्या तारखा ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरातच्या सूरत येथील दांडी दौऱ्यावर आहेत. तर भाजप अध्यक्ष अमित शाह हे आजपासून कानपूर-बुंदेलखंड येथे बूध अध्यक्षांच्या संम्मेलनाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरातच्या दांडी येथे भेट देणार आहेत. तिथून ते सूरतच्या हवाई मार्गावर टर्मिनल भवनच्या विस्ताराचे भूमीपूजन करतील. तसेच एका हॉस्पीटलचेही भूमिपूजन करतील. याशिवाय न्यू इंडिया यूथ कॉन्क्लेवमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या माहितीनुसार, सूरत हवाई मार्गावरील टर्मिनल भवनच्या विस्ताराचे भूमिपूजन आज करण्यात येणार आहे. सौर उर्जा आणि एलईडी प्रकाश व्यवस्थेच्या वापरामुळे हे एक पर्यावरण अनुकूल भवन असणार आहे. 1800 प्रवशांची क्षमता असलेले हे टर्मिनल असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


त्यांचा पुढचा प्रवास हा गुजरातमधील नवसारी जिल्ह्याच्या दांडी येथे होईल. तेथे ते महात्मा गांधी राष्ट्रीय मीठ सत्याग्रम स्मारक देशाला समर्पित करतील. या स्मारकात ऐतिहासिक दांडी मीठ यात्रे दरम्यान महात्मांसोबत 80 सत्याग्रहींच्या मुर्ती देखील असणार आहेत.



या स्मारकात ऐतिहासिक 1930 मध्ये मीठाच्या सत्याग्रहातील विविध घटना आणि कहाणी सांगणाऱ्या 24 भिंती आहेत. पंतप्रधान स्मारक पाहिल्यानंतर जनसभेला संबोधित करतील. मीठाच्या सत्याग्रहाला 1930 च्या दांडी यात्रेच्या नावाने ओळखले जाते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ही एक महत्वपूर्ण घटना आहे. 



दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उत्तर प्रदेशच्या पार्टी बूथ अध्यक्षांची भेट घेत थेट संवाद साधणार आहेत. ते आज कानपूर-बुंदेलखंड क्षेत्र आणि जवळच्या बूथ अध्यक्षांच्या संम्मेलनाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष कानपूरमधील रेल्वे मैदानात निराला नगर आणि लखनऊच्या काशीराम स्मृती उपवनमध्ये बूथ अध्यक्षांच्या संम्मेलनाला संबोधित करतील असे पार्टी प्रदेश उपाध्यक्ष जे.पी.एस. राठौर यांनी सांगितले. यावेळी लोकसभा निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्य भाजप अध्यक्ष महेंद्रनाथ पांडे,, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा तसेच इतर वरिष्ठ नेते संम्मेलनाला संबोधित करणार आहेत.