नवी दिल्ली : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत यश प्राप्त करण्यासाठी भाजप तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपचा पूर्ण प्लॅन देखील तयार आहे. या प्लॅनमध्ये तरूण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. देशात असे दोन कोटी तरूण मतदार असल्याचे बोलले जात आहे.


असा आहे प्लॅन...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे तरूण २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणूकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. भाजपने पूर्ण लक्ष या नवीन मतदारांवर केंद्रीत केले आहे. या पूर्ण प्लॅनमध्ये भाजपची सोशल मीडियाची टीम जोरदार काम करत आहे. हा प्लॅन एका अॅपच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. याला 'मिलेनियम वोट कॅपेन' असे नाव देण्यात आले आहे. १८ जानेवारीला हे अॅप लॉन्च करण्यात येईल.


भाजपच्या युवा मोर्च्यातही चर्चा


मीडिया रिपोर्टनुसार, या अॅपच्या माध्यमातून नवीन मतदार जलद जोडले जातील. त्याचबरोबर मतदारांचे ओळखपत्र देखील सहज उपलब्ध होईल. पक्ष या बाबत अतिशय सर्तक असून भाजपच्या युवा मोर्च्यात देखील याबाबत चर्चा करण्यात आली.



म्हणून नवीन मतदारांवर भाजपचे लक्ष


२००० मध्ये जन्मलेल्या तरूण-तरूणी हे २०१८ मध्ये नवीन मतदार असतील. त्यांचा सन्मान व्हायला हवा. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, या वर्षातील नवीन मतदारांचे भारतीय लोकतंत्र स्वागत करत आहे. २०१४ मध्ये युवा आणि महिलांनी मोकळेपणाने बीजेपीचे समर्थन केले होते. तरूणांनी पंतप्रधान मोदींच्या यशात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे २०१९ मध्ये देखील नव्या मतदारांना जोडण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे.