मुंबई :  काश्मीर खो-यात भारतीय लष्करांनं (Indian Army) दहशतवादाविरोधात (terrorists) कडक मोहीम हाती घेतली. सुरक्षादलानं गेल्या 72 तासांत तब्बल 10 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. हे दहशतवादी मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते. (Mission Allout by Indian Army 10 terrorists eliminated)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात भारतीय लष्करानं आक्रमक भूमिका घेतलीये. शत्रूचा खात्मा करण्यासाठी सुरक्षादलांनी जम्मू-काश्मीरमधअये मिशन ऑलआऊट सुरू केलंय. त्यानुसार गेल्या 72 तासांचा एक दोन नव्हे तर तब्बल 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. शुक्रवारी पुलवामातल्या हाजिन गावात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या  चकमकीत सुरक्षादलानं 5 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक भारतीय जवान शहीद झालाय.


याआधी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचे  3 दहशतवादी ठार झालेत. तर 29 जूनला श्रीनगरच्या परीमपोरा भागात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. 


काश्मीरला दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अतिरेक्यांची यादीच तयार करण्यात आलीये. या भागात सुरक्षा दलानं सर्च ऑपरेशन जारी केलंय. त्यामुळे सीमेपलिकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या पायाखालची वाळू सरकलीये. 


कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानं पर्यटक पुन्हा एकदा काश्मीरकडे परतू लागलेत. परिस्थिती सामान्य होत असल्यानं इथला पर्यटन व्यवसाय जोर धरू लागलाय. असं असताना पाकिस्तानी दहशतवादी जाणीवपूर्वक काश्मीरच्या विकासात खीळ घालू पाहतायेत. या प्रश्नाचं उत्तर एकच आहे ते म्हणजे जोपर्यंत काश्मीर खो-यातून दहशतवादाचा खात्मा होत नाही, तोवर ऑपरेशन ऑलआऊट सुरूच राहणार.