Chandrayaan 3 Moon Landing Today: अवकाश संशोधन क्षेत्रात आज भारत ऐतिहासिक कामगिरी करणारेय. चांद्रयान मोहिमेतला (Mission Chandrayan-3) सर्वात महत्त्वाचा टप्पा आज साकारला जाईल. भारताच्या चांद्रयान 3 मधील विक्रम रोव्हर  (Vikram Lander) आज प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारेय. संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर (Pragyan Rover) उतरणारेय. भारताच्या चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक लँडिंगकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयानाचे लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रमच्या लँडिंगसाठी ऑल सेट असं ट्विट इस्रोने (ISRO) केलंय. संध्याकाळी 5.44 वा. लँडर मोड्युल ठरलेल्या ठिकाणी पोहोचणार असं इस्रोने म्हटलंय. इस्रोने लँडिंग संदर्भात हे महत्त्वाचं ट्विट केलंय. संध्याकाळी 5.44 वा. लँडिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे.  चांद्रयान-2 मध्ये ज्या त्रुटी होत्या, त्या दूर करण्यात आल्यात. चांद्रयान-3 ला नक्की यश मिळेल असा विश्वास इस्रोचे माजी प्रमुख के.सिवन यांनी व्यक्त केलाय. चांद्रयान 3 चंद्रावर पोहोचताना शेवटची १७ मिनिटं अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. कारण या १७ मिनिटांमध्ये इस्रो लँडरशी कुठलाही संपर्क करु शकणार नाही... त्यामुळे शेवटच्या 17 मिनिटांमधली कामगिरी विक्रम लँडर स्वतःच्या बुद्धिमत्तेनं करणार आहे.


देशभरात होमहवन-पूजा
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी यासाठी ठिकठिकाणी प्रार्थना केल्या जातायत. पुण्यात चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंग साठी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक करण्यात आला..भल्या पहाटे दूध, दही, विविध फळांचे रस, सुकामेवा असा अभिषेक करण्यात आला.. याशिवाय गणपती बाप्पांच्या मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आलं.. तर चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सारसबाग गणपतीची आरती करण्यात आली.. नागपुरात अजित पवार गटाकडून चांद्रयानाच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगसाठी यज्ञ करण्यात आला.. टेकडी गणपती इथे आराधना करण्यात आली.. तर नाशिकमध्ये शिंदे गटानं चांद्रयानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी चांदीच्या गणपतीला साकडं घातलं..


चांद्रयान तीन मोहीम यशस्वी व्हावी यासाठी धुळ्यात महाआरती करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्री आई एकवीरा देवी मंदिरामध्ये ही महाआरती केली. यावेळेस चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. सोलापुरात भाजपा कडून चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरकडे साकडं घालण्यात आलं. 


शेवटची पंधरा मिनिटं महत्त्वाची
सध्या लँडर चंद्राच्या 25 किलोमीटरच्या परिघात प्रदक्षिणा मारतंय.  चांद्रयान चंद्रावर लँड होण्याआधीची 15 मिनिटं अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. चांद्रयान चंद्राकडे झेपावल्यानंतर इस्रोचा त्याच्याशी संपर्क कायम आहे.  मात्र या शेवटच्या 15 मिनिटांत इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही. चंद्रावर सुरक्षित सॉफ्ट लँडिग करण्याची जबाबदारी शेवटी लँडर विक्रमच्याच खांद्यावर असणार आहे. योग्य उंची ठेवून, योग्य प्रमाणात इंधनाचा वापर करण्याची जबाबदारीही लँडरची असणार आहे. विक्रम लँडरचे सेन्सर्स आणि दोन इंजिन्सनी काम करणं बंद केलं तरीही चंद्रावर सॉफ्ट लँडिंग शक्य होणार आहे.