मिझोराम : कोंबडीच्या पिल्लाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या निरागस डेरेक सी लालचनहीम या मुलाचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्याचा कोंबडीच्या पिल्लाला घेऊन जाताना आणि त्याच्या हातात दहा रुपयांच्या नोटेचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, सायकलच्या खाली कोंबडीचे पिल्लू आले. मात्र, त्यात त्या पिल्लाचा जीव गेला. मात्र, या चिमुकल्याला कळले नाही. ते जखमी झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचार करणे गरजेचे आहे, हेच त्या बाळाला ठावूक होते. त्याने कोंबडीच्या पिल्लावर उपचार करण्यासाठी घरी हट्ट केला. मात्र, कोणीही लक्ष दिले नाही म्हणून चक्क पिल्लाला घेऊन तो रुग्णालायत पोहोचला. त्याची ही मदत करण्याची वृत्ती कौतुकाचा विषय आणि प्रेरणा ठरली आहे. ही बातमी कळताच त्याच्या शाळेनेही त्याचा गौरव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिझोरममधील हा मुलगा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. कारण त्याची कामगिरीही तशीच आहे. सायकलच्या चाकाखाली आलेल्या कोंबडीच्या पिल्लाला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर झळकला आणि तो स्टार झाला. त्याचा फोटो सोशल मीडियावर ८१ हजारहून अधिक जणांनी शेअर केला आहे. त्याच्या पोस्टमधील डेरेकचे हावभाव सर्व काही सांगून जात आहेत. या लहानग्याची बावरलेली मुद्रा रुग्णालयातील एका परिचारीकेने आपल्या स्मार्ट मोबाइलमध्ये टिपली आणि हाच फोटो नंतर व्हायरल झाला.



डेरेकच्या कृतीचे देशभरातून कौतुक होत आहे. त्याच्या शाळेने फुले आणि विशेष प्रमाणपत्र देऊन त्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, या लहानग्याची ही पोस्ट शेअर करणारे सांगा लिहितात, ‘ते कोंबडीचे पिल्लू मेल्याचे डेरेकला समजले नव्हते. त्याने आपल्या पालकांकडे त्या पिल्लाला रुग्णालयात घेऊन जाण्याचा हट्ट केला. मात्र पालकांनी त्याला नकार दिल्यानंतर डेरेक स्वत:च हातात दहा रुपयाची नोट घेऊन त्या पिल्लाचा उपचार करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला.’