मुंबई : कोरोनाच्या संकट काळात अनेकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अनेकांना आपल्या कुटुंबाच्या संगोपनासाठी घरात असलेले सोन्याचे दागिने विकण्याची वेळ आली आहे. मात्र असं करताना त्यांना ज्वेलर्सकडून योग्य ती रक्कमही मिळत नाही. अशावेळी एक कंपनी तुमच्या मदतीला धावून आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमच्या घरी सोन्याचे दागिने असतील तर तुम्ही सरकारी कंपनी MMTC-PAMP ची मदत घेऊ शकते. ही कंपनी तुमचे सोन्याचे दागिनेच विकत घेणार असं नाही तर तुम्हाला कॅशबॅक देखील देणार. तसेच इतर सुविधाही देणार आहे. 


याकरता लोकांकडे १० ग्रॅम सोनं जवळ असणं आवश्यक आहे. जर या कंपनीसोबत व्यवहार पूर्ण झाला नाही तर तुम्हाला हजार रुपयांची फी भरावी लागेल. 


एमसीएक्समध्ये ऑक्टोबरमध्ये डिलीव्हरी झालेल्या सोन्याची किंमत ९८ रुपये म्हणजेच ०.२ टक्क्यांच्या घटसह ४९ हजार ८०६ रुपये प्रति १० ग्रॅम राहीले. यामध्ये ४,२१९ लॉटसाठी व्यवसाय झाला. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव ०.०९ टक्क्याहून खाली येऊन १,८७५.३० डॉलर राहीला. 


इंदौरमध्ये स्थानिक सराफा बाजारात शुक्रवारी सोनं १२५ रुपये प्रति १० ग्राम आणि चांदीचा भाव १२५० रुपये प्रति किलोग्रॅम पाहायला मिळाला. सध्याच्या व्यापारात सोनं सर्वाधिक ५०,७५० च्या खाली ५०,६०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी वर ५८,००० आणि खाली ५७,८००० रुपये प्रति किलो ग्रॅम विकली गेली. सोना ५० ६५० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ५७, ९०० रुपये प्रति किलोग्रॅम आणि चांदीची नाणी ७२५ रुपये प्रति नग राहीली. 


गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत ४८५ रुपये नुकसानी सोबत ५०, ४१८ रुपये प्रति १० ग्राम राहीली. HDFC सिक्युरीटीजच्या म्हणण्यानुसार, आदल्या दिवशी व्यवसाय ५०, ९०३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. चांदी देखील २,०८१ रुपयांवर कमी होऊन ५८,०९९ रुपये प्रति किलोग्रॅमवर राहीली. मागच्या व्यावसायिक सत्रात ६०,१८० रुपये प्रति किलोग्रॅम होती.