नवी दिल्ली: खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी गोड बातमी दिली आहे. तब्बल १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय. या निर्णयानुसार धान पिकाच्या हमीभावात २५० रुपयांची वाढ करण्यात आलीय. त्यामुळं धान उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव निश्चित करण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडाळची भेट घेतली. या भेटीवेळी मोदींनी निर्णायाची माहिती शेतकऱ्यांना दिली होती. 


हमीभावाच्या वाढीबाबत महत्त्वाचे मुद्दे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सरकारने खरीप पिकांवर एमएसपी २०० रूपयांची वाढ 
- केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय
- १५५० वरून १७५० प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
- मागील वर्षी ८० रूपये एमएसपी वाढविली होती
- खरीप पीकांची पेरणी मान्सून सोबतच सुरू होते
- उत्पादन खर्चावर किमान दीड टक्के एमएसपी दिली जाईल असे आश्वासन सरकारने दिले होते.


धान्य- पूर्वीचे वर्षाचे दर - आत्ताचे दर


- मका - १४२५ वरून १७००
- तूर - ५४५० वरून ५६७५
- उडद - ५४०० वरून ५६००
- ज्वार - १७२५ वरून २३४०
- बाजरी - १४२५ वरून १९५० 
- मूग - ५५७५ वरून ६९७५
- सोयाबीन - ३०५० वरून ३३९९
- तीळ - ५३०० वरून ६४२९
- सुर्यफूल - ४१०० वरून ५३८८
- शेंगदाणे - ४४५० वरून ४८९०
- कॉटन मिडीयम स्टेपल - ४०२० - ५१५०
- कॉटन लाँग स्टेपल - ४३२० - ५४५०