मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री बनले `पंक्चरवाले` वीरेंद्र कुमार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये सामाविष्ट झालेले मध्य प्रदेशच्या टीकमगडचे खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेय.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये सामाविष्ट झालेले मध्य प्रदेशच्या टीकमगडचे खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेय.
मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळवणारे खाटीक एकेकाळी आपल्या वडिलांसोबत सायकलचे पंक्चर काढण्याचे काम करीत. शाळेत असतानाच ते अभ्यासासोबत वडिलांसोबत दुकानात काम करीत.
वीरेंद्र यांनी अर्थशास्त्रात एमएची पदवी घेतलीये. खाटीक हे त्यांच्या साधी राहणीसाठी प्रसिद्ध आहेत. आजही ते आपल्या जुन्या हिरव्या रंगाच्या स्कूटवरुन शहरात फिरतात. १९९६मध्ये वीरेंद्र यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. आतापर्यंत त्यांनी सहावेळा लोकसभा निवडणूक जिंकलीये.