नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने ६ रब्बी पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या वाढलेल्या हमीभावाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रब्बीच्या २०२०-२१ या वर्षात प्रमुख पिकांचा हमीभाव वाढवण्याला मंजुरी देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना लागत मूल्याच्या १०६ टक्क्यांपर्यंत लाभ मिळेल, तसंच एमएसपीवर खरेदी पुढेही सुरू राहिल, असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने संसदेत कृषी विधेयकं संमत करून घेतल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या कायद्यांमुळे सध्याचा हमीभाव कमी होईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती, त्यामुळे देशात अनेक ठिकाणी आंदोलनंही झाली. त्यातच आता केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या हमीभावाची घोषणा केली आहे. 


रब्बी पिकांचा हमीभाव  


हरबरा


हमीभाव- ५,१०० रुपये प्रति क्विंटल


वाढ- २२५ रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच ४.६ टक्के 


नफा- ७८ टक्के 


जव 


हमीभाव- १,६०० रुपये प्रति क्विंटल 


वाढ- ७५ रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच ४.९ टक्के 


नफा- ६५ टक्के 


मसूर 


हमीभाव- ५,१०० रुपये प्रति क्विंटल 


वाढ- ३०० रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच ६.३ टक्के 


मोहरी


हमीभाव- ४,६५० रुपये प्रति क्विंटल 


वाढ- २२५ रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच ५.१ टक्के 


नफा- ९३ टक्के 


कुसुंभ


हमीभाव- ५,३२७ रुपये प्रति क्विंटल 


वाढ- ११२ रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच २.१ टक्के 


नफा- ५० टक्के 


गहू 


हमीभाव- १,९७५ रुपये प्रति क्विंटल 


वाढ- ५० रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच २.६ टक्के 


नफा- १०६ टक्के 


तांदूळ


हमीभाव- १,८६८ रुपये प्रति क्विंटल