मुंबई : #MeToo कँपेनने बॉलिवुडमध्ये एक भूकंपच आणला आहे. अनेक प्रसिद्ध लोकांवर गंभीर आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली. #MeToo कँपेनमध्ये अनेक महिलांनी स्वत:वर झालेल्या यौन शोषणाच्या विरोधात आवाज उठवला. मोदी सरकार आता या विरोधात कठोर कारवाई करणार आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात चौकशीसाठी एका समितीचं गठन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कायद्याच्या आधारे महिलांच्या शोषणासंबंधित प्रकरणाशी निपटण्यासाठी काम करेल.


#MeToo चळवळीमुळे या समितीचं गठन करण्यात आलं आहे. अनेक महिलांनी यौन शौषणाचा आरोप करत अनेकांवर उघडपणे आरोप केलेत. एमजे अकबर यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना देखील परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. 


समितीमध्ये कोण-कोण:


या समितीमध्ये परिवहन मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांचा समावेश आहे.


गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, यौन शोषण संबंधित प्रकरणात हे मंत्री लक्ष घालणार असून कायद्याच्या आधारे महिलांना न्याय देण्यासाठी आणि यामध्ये योग्य ती कारवाई करण्यासाठी काम करणार आहेत.


अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरोधात तनुश्री दत्ता हिने गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर देशात 'मी टू' चळवळ सुरु झाली. एकामागे एक अनेक महिलांना आपल्यावर झालेल्या अत्याचारावर आवाज उठवला. आतापर्यंत अभिनेता आलोक नाथ, दिग्दर्शक सुभाष घई, साजिद खान, रजत कपूर या सारख्या व्यक्तींवर गंभीर आरोप झाले आहेत.