नवी दिल्ली: मोदी सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता हॉलमार्कशिवाय सोन्याच्या दागिन्यांची विक्री होऊ शकणार नाही. १५ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती केंद्रीय उपभोक्ता मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर पासवान यांनी देशातील सर्व सराफा व्यापाऱ्यांना सोन्याच्या जुन्या दागिन्यांचा साठा संपवण्याचे आदेशाही दिले आहेत. सध्याच्या घडीला देशातील सहा लाख लहानमोठ्या सराफा व्यापाऱ्यांपैकी केवळ २६०१९ ज्वेलर्सकडूनच हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री केली जाते. त्यामुळे अनेकदा ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार घडतात. 


मोबाईलवर बोलणं डिसेंबरपासून होणार महाग


केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सराफा व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. कारण, हॉलमार्कमुळे सोन्यात भेसळ करणे शक्य होणार नाही. परिणामी सोन्याची गुणवत्ता निश्चित होऊन ग्राहकांच्या फसवणुकीचा धोका उरणार नाही. त्यामुळे नकली दागिन्यांच्या निर्मितीला आळा बसेल, असेही रामविलास पासवान यांनी म्हटले. 


सध्याच्या घडीला देशातील २३४ जिल्ह्यांमध्ये भारतीय मानक ब्युरोची (बीआयएस) ८७७ हॉलमार्क केंद्रे आहेत. यापैकी बहुतांश केंद्रे ही शहरी भागांमध्ये आहेत. त्यामुळे लहान शहरांमधील सराफा व्यापारी आणि ग्राहकांसमोर या निर्णयामुळे पेच उभा राहण्याची शक्यता आहे.