मोदी सरकार अविश्वास ठराव, सुप्रिया सुळे यांचे मौन
अविश्वासदर्शक ठरावावर चर्चा होताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मौन बाळगल्याचे पाहायला मिळाले.
नवी दिल्ली : अविश्वासदर्शक ठरावावर चर्चा होताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मौन बाळगल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात सुप्रिया सुळे राज्यातील आंदोलनाचे नेतृत्व करताना दिसतात. या आंदोलनातून त्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधतात. मात्र अविश्वास प्रस्ताव चर्चेवेळी सुप्रिया सुळे गप्पच असल्याचे दिसून आलं. सहा खासदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फक्त तारीक अन्वर मैदानात उभे असल्याचे पाहायला मिळाले.