तुमचं लग्न झालंय का? अरे व्वा! मग मोदी सरकार देणार 72000 रुपये
विवाहितांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी
NPS Scheme: तुमचं लग्न झालं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची. कारण, बोहल्यावर चढलेल्या नवरदेवांसाठी मोदी सरकारनं मोठी भेट दिलीये. आता म्हणे केंद्र सरकारकडून विवाहित जोडप्यांना 72 हजार रुपये इतका मदत निधी देण्यात येणार आहे. अर्थात यासाठी जोडप्यांनीही काही योगदान देणं अपेक्षित आहे. (modi government will gives 72000 rs to married people as pair know the process scheme and details)
कशी मिळणार रक्कम?
मोदी सरकराच्या या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही बँकेतील खातं किंवा जन धन योजनेअंतर्गत असणारं खातं असणं अपेक्षित आहे. शिवाय तुमच्याकडे आधार कार्ड असणंही अपेक्षित आहे. अवघ्या काही मिनिटांतच तुम्ही या योजनेत नाव नोंदणी करु शकता.
कोणा व्यक्तीचं वय जर 30 वर्षे आहे तर त्यांनी या योजनेअंतर्गत 100 रुपये प्रती महिना गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. म्हणजे वर्षाला तुमची गुंतवणूक असेल 1200 रुपये. अशा प्रकारे 60 वर्षांपर्यंत तुमच्या वतीनं जवळपास 36 हजार रुपयांची गुंतवणूक झालेली असेल. या आधारे तुम्हीला दर महिन्याला 3 हजार रुपयांची पेन्शन मिळेल.
दुर्दैवानं काही संकट ओढावल्यात तुमच्या पत्नीला दर महिन्याला 6 हजार रुपये इतकी पेन्शन रक्कम मिळेल. म्हणजेच पत्नी आणि तुम्हाला मिळून एकत्रितरित्या सरकारकडून 72 हजार रुपये दर वर्षी मिळू शकणार आहेत.
परतावा वाढूही शकतो
भविष्य आणखी सुरक्षित करण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करु शकता. यासाठी तुमचं वय 18 ते 40 च्या दरम्यान असणं अपेक्षित आहे. National Pension Scheme अंतर्गत सर्व नागरिकांना निवृत्तीनंतरही आत्मनिर्भर करण्याचं मूळ लक्ष्य सध्या मोदी सरकारकडून साध्य करण्यावर भर दिला जात आहे. आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकता.