नवी दिल्ली : सरकारी कार्यालयांमध्ये आता इलेक्ट्रिक कार दिसणार आहेत. यासाठी १० हजार बॅटरी ऑपरेटेड कार खरेदी करण्यासाठी टेंडर जारी करण्यात आलं आहे. कार खरेदी झाल्यानंतर नोव्हेंबरपासून केंद्रीय मंत्री आणि सीनियर ब्यूरोक्रेट्स इलेक्ट्रिक कारमध्ये प्रवास करतांना दिसणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय राजधानी एनसीआरमध्ये ४००० चार्जिंग स्टेशन देखील यासाठी उभारण्यात येणार आहेत.


ऊर्जा क्षेत्रात कार्यरत सरकारी कंपनी प्रमोट एनर्जी एफिशंसी सर्विसेज लिमिटेड (EESL) ने टेंडर जारी केलं आहे. शुक्रवारी आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल्स) जारी केलं जाणार आहे.


ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं की, 'आम्ही सरकारी विभागांपासून याची सुरुवात करणार आहे. याआधी बुधवारी ईईएसएल आणि सरकारी ईंधन रिटेल कंपन्यांमध्ये पेट्रोल पंपवर कमी वीज लागणाऱ्या एलईडी बल्ब विकण्यासाठी देखील प्रस्ताव पास झाला.


ईईएसएलचे एमडी सौरभ कुमार यांनी म्हटलं की, कंपनी सुरुवातीला ६ महिन्यांमध्ये १००० इलेक्ट्रिक कार खरेदी करणार आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार १२० ते १५० किमी पर्यंत धावेल.