मथुरा : आरएसएस प्रमुख मोहन भागवत यमुना एक्सप्रेस-वेवर झालेल्या रस्ता अपघात थोडक्यात बचावले. त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. यमुना एक्सप्रेस-वे के सुरीर ठाण्याच्या भागात ही घटना घडली. या अपघातानंतर त्यांना दुसऱ्या कारने वृंदावनला पाठविण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. यमुना एक्स्प्रेस वेवरुन त्यांचा ताफा जात असताना हा अपघात घडला. 



यावेळी मोहन भागवत मथुराच्या दिशेने प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात मोहन भागवत यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. मथुराच्या सुरीर परिसरात मोहन भागवत यांच्या ताफ्यातील एका गाडीचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला. 


यानंतर मागून येणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात सरसंघचालक थोडक्यात वाचले आहेत. दरम्यान, अपघातानंतर भागवत पुढील प्रवासासाठी रवाना झाले. मथुरा येथे त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे.