सरसंघचालक राष्ट्रपती मुखर्जींच्या भेटीला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भेटीला राष्ट्रपती भावनात गेले आहेत
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भेटीला राष्ट्रपती भावनात गेले आहेत
गेल्या तीन तासांपासून या दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. प्रणव मुखर्जी आणि मोहन भागवत या दोघांनी दुपारचं जेवणही एकत्रच केलं. राष्ट्रपती भवनात ही बैठक सुरू आहे
राष्ट्रपती भवनाकडून मात्र, ही सहज बैठक असल्याचं सांगण्यात येतं असलं तरी त्यामुळे चर्चेचा विषय काय आहे? नेमकी कशासाठी आहे ही बैठक? याबाबत मोठी उत्सुकता अनेकांना लागून राहिलीय.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.