नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आहे. राष्ट्रपती भवनामध्ये या दोघांमध्ये भेट झाली आहे.  तीन तासांपेक्षा जास्त वेळ या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. प्रणव मुखर्जी आणि मोहन भागवत या दोघांनी दुपारचं जेवणही एकत्रच केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती भवनाकडून मात्र, ही सहज बैठक असल्याचं सांगण्यात येतं असलं तरी त्यामुळे चर्चेचा विषय काय आहे? नेमकी कशासाठी आहे ही बैठक? याबाबत मोठी उत्सुकता अनेकांना लागून राहिलीय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.