मोहन भागवत यांच्या विधानाचा विपर्यास- आरएसएस
भारतीय लष्करावरील मोहन भागवत यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे.
नवी दिल्ली : सरकार आणि घटनेनं परवानगी दिली, आणि शत्रूशी लढण्याची वेळ आलीच, तर अवघ्या तीन दिवसात संघाचे स्वयंसेवक तयार असतील, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
बिहारच्या मुज्जफरपूरमध्ये वादग्रस्त वक्तव्य
मोहन भागवत बिहारच्या मुज्जफरपूरमध्ये संघाच्या शिबिरात बोलत होते. मोहन भागवत यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे. यावर विरोधकांची प्रतिक्रिया येण्याआधीच, या विधानाचा विपर्यास झाल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वंयम सेवक संघाकडून देण्यात आलं आहे.
मोहन भागवत यांचं वादग्रस्त वक्तव्य
शत्रूशी युद्ध पुकारण्याची वेळ आली,तर लष्कराला तयारीसाठी सहा ते सात महिने लागू शकतात. पण संघाची शिस्त निमलष्करी दलाप्रमाणे आहे. त्यामुळे कायद्यानं परवानगी दिली, तर संघाचे स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसात लढाईसाठी तयार होऊ शकतात, असं मोहन भागवतांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विधानाचा विपर्यास झाल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वंयम सेवक संघानं एका प्रसिदधी पत्रकारद्वारे म्हटलं आहे. दरम्यान अमित शहा यांनी आपण ते वक्तव्य ऐकल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करू, असं म्हटलं आहे.