मध्य प्रदेशातील (madhya pradesh) बुरहानपूरमध्ये एक मजेशीर व्हिडीओ समोर आली आहे. एक 3 वर्षीय निष्पाप मुलगा आपल्या आईची (Mother) तक्रार करण्यासाठी बुरहानपूरच्या देडतलाई पोलीस ठाण्यात (Police Station) पोहोचला होता. या तीन वर्षांच्या मुलाला अंघोळ घातल्यानंतर त्याच्या आईने त्याला काजळ लावण्याचा प्रयत्न केला. मुलाने याचा विरोध करत तक्रार करण्यास सुरुवात केली. यावर आईने त्याच्या गालावर प्रेमाने चापट मारली. या गोष्टीचा मुलाला इतका राग आला की त्याने आईची तक्रार करण्यासाठी थेट पोलीस गाठलं. त्यावेळी पोलिसांनी या लहानग्याचा व्हिडीओ शूट केलाय. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. (Mom steals my chocolate put her in jail madhya pradesh boy complains to police station)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई माझी कँडी आणि चॉकलेट चोरते, तिला तुरुंगात टाका असे मुलाने पोलिसांना सांगितले. निरागस मुलाची ही तक्रार ऐकून पोलिसांसह उपस्थित लोकांचे हसूच सुटले. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने कागद उचलला आणि मुलाची खोटी तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर मुलाला त्यावर स्वाक्षरी करण्यासही सांगितली. मुलाने पेन धरून कागदावर आडव्या रेषाही काढल्या.


बुरहानपूरच्या डेडतलाई येथे रविवारी सकाळी आईने तीन वर्षाच्या मुलाला अंघोळ घालत तयार केले आणि काजळ लावण्याचा प्रयत्न केला. त्याने विरोध केल्यानंतर आईने त्याला मारले. पण यानंतर तो थेट पोलिसांत जाईल हे त्याच्या आईला माहिती नव्हते. आईवर रागावलेल्या मुलाने वडिलांकडे जाऊन आईला पोलीस ठाण्यात नेऊन जेलमध्ये पाठवण्याचा आग्रह धरला. त्याच्या निरागसतेवर त्याचे पालकही हसले. मात्र मुलाने हट्ट केल्यावर वडिलांनी त्याचं मन राखण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात नेले.



मुलाचे बोलणे ऐकून पोलीस कर्मचारी प्रियंका नायक यांना हसू आवरता आले नाही. त्यांनी थेट पेन आणि कागद उचलला आणि तक्रार लिहायला सुरुवात केली. यावेळी मुलगा मम्मी कँडी-चॉकलेट चोरत असल्याबद्दल तक्रार नोंदवत होता आणि तिथे उपस्थित सर्वजण हसत होते. अखेर प्रियंका यांनी तिला आपण तुरुंगात पाठवू असे सांगत अनेक विनंत्या करत त्या चिमुकल्याला घरी पाठवले.