मुंबई : आपल्यापैकी अनेक लोकांना बाहेरचं खायला आवडतं. बाहेरचं जंग फूड चवीला अतीशय टेस्टी असतं. ज्यामुळे लोकांचा कल याकडे जास्त वळला आहे. परंतु असं असलं तरी जंक फूड हा आपल्या पोटासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे जाणून घेणं सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. यासगळ्यामध्ये तरुणांच्या आवडीचा आणि जवळचा फूड म्हणजे मोमोज. मोमोजचे वेगवेगळ्या प्रकारात येतं. म्हणजेच रोस्टेड, बार्बीक्यू, स्टीम, फ्राय इत्यादी. आपण चटणीसोबत आनंदाने मोमोज खातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीला मोमोज खाण्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. कारण यामुळे त्यांना त्याचा जीव गमवावा लागला आहे.


AIIMS च्या तज्ज्ञांच्या मते, मोमोज न चघळता गिळल्यास ते पोटात अडकून मृत्यूही होऊ शकतो. एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार मृत व्यक्तीचे वय 50 वर्षे होते. तो दारूच्या नशेत होता आणि तो एका दुकानात मोमोज खात होता. यादरम्यान तो जमिनीवर पडला.


व्यक्तीचा मृत्यू कसा झाला?


पोस्टमॉर्टम रिपोर्टचा संदर्भ देत फॉरेन्सिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोमोज त्याच्या विंडपाइपमध्ये अडकले होते. अशा समस्येला न्यूरोजेनिक कार्डियाक अरेस्ट म्हणतात.


तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण अशी कोणतीही वस्तू खातो, ज्याचा आकार मोठा असतो त्यावेळा असा पदार्थ डायरेक्ट न गिळता, त्याला चावून खा. कारण आपण जर असे केले नाही तर ती गोष्ट सरळ आपल्या श्वसन नलिकेत अडकू शकते. ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट खाताना काळजी घ्या आणि 32 वेळा चावूनच घास खा.