पैशाला पैसा ओढतो! 15 वर्षात 1 कोटी रुपयांचा फंड होईल तयार; येथे करा गुंतवणूक
कोट्याधीश बननं मोठी गोष्ट नाही. फक्त यासाठी योग्य दिशेने गुंतवणूक करणे गरजेचं आहे.
मुंबई : कोट्याधीश बननं मोठी गोष्ट नाही. फक्त यासाठी योग्य दिशेने गुंतवणूक करणे गरजेचं आहे. जर गुंतवणूक योग्य नियोजनानुसार केली तर, कोट्याधीश बनण्याचे लक्ष नक्कीच साध्य होते. परंतु गुंतवणूकदारांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गुंतवणूक कुठे करावी.
आता कोट्याधीश बनन्यासाठी खुप मोठा काळ घेण्याची गरज नाही. फक्त 15 वर्षाच्या गुंतवणूकीतून कोट्याधीश बनता येईल. सर्वसाधारणपणे गुंतवणूक सल्लागारांकडे हाच प्रश्न येतो की, कोट्याधीश बनन्यासाठी कशात गुंतवणूक करावी. या सर्वांना सल्लागार बहुतांष वेळा एकच उत्तर देतात. ते म्हणजे 'म्युचूअल फंड सही है'
SIP योग्य पर्याय ?
म्युचूअल फंड तज्ज्ञांच्या मते गुंतवणूक करताना आपल्याला लक्ष माहित असायला हवे. त्यानंतर म्युचूअल फंड कॅल्युलेट करता येते. की आता तुमचे वय किती? जसजसे वय वाढेल तसतशी गुंतवणूकीची रक्कमही वाढवावी लागेल. यासाठी सर्वात उत्तम पर्याय SIP आहे. मोठ्या रक्कमेपासून तुम्ही SIP सुरू करीत असाल तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला जास्त पैसे मिळतील. सोबतच त्यात नुकसानाची शक्यता कमी असते.
दीर्घ काळासाठी टार्गेट
जर तुम्हाला 1 कोटीचा फंड हवा असेल तर, अवधीचा दृष्टीकोन ठेवावा लागेल. सोबतच गुंतवणूक सायकल नियमित ठेवावी लागेल. आधीच टार्गेट सेट कराल तर, मोठा परतावा मिळू शकेल. तज्ज्ञांच्या मते 10 वर्षाच्या वरच्या गुंतवणूकीसाठी म्युचूअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सर्वात उत्तम पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक दारांना 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. निवृत्तीच्या 10 - 15 वर्षापूर्वीदेखील SIP सुरू करता येऊ शकते.
15 वर्षात तयार होईल फंड
जर 15 वर्षात 1 कोटींचा फंड हवा आहे. तर त्या कालावधीत 12 टक्के परताव्याच्या हिशोबाने दर महा 20 हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर 15 वर्षात 36 लाख रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. आणि तुमच्याकडे 1 कोटींचा फंड तयार होईल.