मुंबई: प्रेम ते प्रेम असतं मग माणसाचं असो किंवा प्राण्याचं. आपल्यापासून जर कुणी दूर गेलं तर आपल्या मनाला खूप लागतं. सुचत नाही आपण सैरभैर होतो. असाच प्रकार एका माकडाचा बाबत घडला आहे. एका माकडानं चिमुकल्याला अक्षरश: आपल्या हृदयाशी कवटाळलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या माकडाला पाहून या चिमुकल्याची आई धावत आली तिने त्या चिमुकल्याला माकडाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. आईला ते माकड आपल्या मुलाला काही इजा पोहोचवू नये म्हणून सावधगिरी बाळगत होती. मात्र तिचा हात झिटकारून माकडानं मुलाला आपला हृदयाशी घट्ट कवटाळलं होतं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



एकीकडे हा व्हिडीओ मजेशीर वाटू शकतो. मात्र या माकडाच्या या मुलाप्रती असलेल्या भावना पाहून डोळ्याच्या कडा ओलावल्याशिवाय रहात नाहीत. भावुक करणारा हा व्हिडीओ हरभजन सिंगने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. 


आजपर्यंत अनेकदा माकड त्रास देताना किंवा काहीतरी मजामस्ती करतानाचे व्हिडीओ आपण पाहिले किंवा समोर आले. मात्र या चिमुकल्याला कोणी इजा पोहोचवू नये म्हणून झटणारे हे माकड सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.