मुंबई : मान्सूनबाबत (Monsoon Update 2022) मोठी अपडेट समोर आली आहे.  हवामान विभागानं (IMD) आधी वर्तवलेल्या  अंदाजानुसार मान्सून 6 दिवसांआधी अंदमानमध्ये दाखल झाला. पुढेही त्याचा प्रवास असाच सुरू राहणार आहे. पण त्याचा वेग मात्र काहीसा मंदावल्याचं आता दिसतंय. सध्या मान्सून अरबी समुद्रात (Arebian Sea) लक्षद्विप बेटांच्या जवळ असल्याचं हवामान विभागाने काल रात्री जारी केलेल्या नकाशावरुन स्पष्ट दिसत आहे. (monsoon trapped near lakshadweep island in arabian sea clear from forecast released by meteorological department)
 
मान्सूनपूर्व सरी कोसळत असल्या तरी मान्सूनचा वेग काहीसा मंदावलाय. मान्सूननं अंदमान निकोबार व्यापल्यावर त्याचा प्रवास काहीसा मंदावल्याचं दिसतंय. मान्सूननं  गेल्या 2 दिवसांपासून फारशी प्रगती केली नसल्याचं समोर आलं आहे. मान्सून अद्यापही बंगालच्या उपसागरातच आहे.


शेतकऱ्यांसाठी थोडी चिंताजनक बातमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात 66 जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व सरी समाधानकारक झालेल्या नाहीत. या 66 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये प्री मान्सून सरी अत्यल्प झाल्या. 


तज्ज्ञांनुसार,  याचा परिणाम पेरणीपूर्व कामं आणि खरीप हंगामावर होऊ शकतो. खरीप हंगामापूर्वी जमिनीची मशागत करण्यावर याचा परिणाम होणार आहे. हवामान विभागाने राज्यात बहुतांश भागात 27 मेपर्यंत कोरड्या हवामानाचा इशारा दिलाय.