केरळमध्ये मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता
यंदा मान्सूनचे वेळआधीच आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सून २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय.
नवी दिल्ली : यंदा मान्सूनचे वेळआधीच आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सून २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय. मान्सून अपेक्षापेक्षा चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती स्कायमेटने दिलीय. केरमध्ये मान्सून साधारणतः १ जूनला केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहचेल अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. २० मे रोजी मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर पोहचेल. यानंतर २४ मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरु होईल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केलाय. तर मान्सून १० ते १५ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहचेल असा अंदाजही स्कायमेटनं वर्तवलाय.याआधी मान्सून १०० टक्के सामान्य राहणार असल्याचा अंदाज ४ एप्रिलला व्यक्त केला होता.