Monthly Income Scheme : दर महिन्याला आपल्या हातात येणारे पैसे महिना अखेरीस नेमके कुठे नाहीसे होतात? या प्रश्नाचं 100 टक्के उत्तर कोणालाही सापडू शकलेलं नाही. महिन्याला होणारा घरखर्च आणि त्यानंतर हातात उरणारी तुटपुंजी रक्कम मनाला चटका लावून जाते. इतकंच नव्हे, तर भविष्याच्या दृष्टीनं Saving करण्याची गरज आहे ही चाहूल देत आपल्याला उधळपट्टीच्या चक्रातून बाहेरही आणत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडक्यात आजच्या घडीला पगार कितीही वाढला तरीही तो पुरतच नाही हे त्रिकाल सत्य.  अशा परिस्थितीत भविष्यासाठी गुंतवणुक कशी आणि कुठून करायची? हाच प्रश्न अनेकांना पडतो. कारण, गुंतवणूक कुठे करायची यासोबतच त्यात नेमकी किती रक्कम गुंतवायची हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. गुंतवणुकीमध्ये परतावा किती मिळतो आणि तो परतावा आपल्याला पुरेसा आहे का याचं गणितही फार आधीच करणं अपेक्षित असतं. सरकारकडून विविध माध्यमातून ग्राहकांना गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जातात. खासगी बँकाही यात मागे नाहीत. 


ICICI Pru GIFT एक नवी योजना... 


 ICICI Bank च्या लाईफ इन्श्युरन्स कंपनी ICICI Prudential कडून GIFT नावाची एक योजना सुरु करण्यात आली आहे. Guaranteed Income For Tomorrow असा याचा सोपा अर्थ. बचतीची सवय लावणारा हा एक इन्श्युरन्स प्लान आहे. ज्यामध्ये तुम्हाला परताव्यासोबत आर्थिक सुरक्षिततेची हमीसुद्धा दिली जाते. या योजनेत इतरही अनेक फायदे तुम्हाला मिळतात. 


ICICI Pru GIFT मध्ये तुम्हाला नियमित परतावा किंवा  lump sump परतावा घेता येतो. जिथं योजनेच्या दुसऱ्या वर्षापासूनच तुम्हाला परताव्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होते. यामध्ये महिला गुंतवणूकदारांना जास्तीचे फायदे मिळतात. शिवाय लाईफ इन्श्युरन्स कवरही मिळतं. किंवा Save the Date हा फिचर निवडून तुम्ही निर्धारित तारखेला परतावा मिळवू शकता. तुम्ही या पॉलिसीच्या बळावर कर्जही घेऊ शकता.


परताव्याचं गणित 


आयसीआयसीआय बँकेच्या या योजनेमध्ये तुम्ही  6, 7, 8, 10 आणि 12 वर्षांसाठी प्रिमियम भरू शकता. जिथं तुम्हाला दुसऱ्याच वर्षापासून परतावा मिळण्यास सुरुवात होईल. ही योजना इतकी लाभदायी आहे की यामध्ये परतावा हमखास मिळतो आणि पॉलिसी पूर्ण झाल्यानंतरही तुम्हाला परताव्याची एकूण रक्कम मिळते. 


हेसुद्धा वाचा : IRCTC देतंय सिक्कीम- गंगटोकच्या निसर्गसौंदर्याशी एकरुप होण्याची संधी; पाहा Indian Railway चा खास प्लान 


 


अधिकृत संकेतस्थळाच्या माहितीनुसार जर तुम्ही या योजनेमध्ये वर्षाला 1 लाखाहून अधिक रक्कम जमा करता आणि 6 वर्षांपर्यंत त्याचं प्रमियम भरता तर, तुम्हाला दुसऱ्या वर्षापासून सातव्या वर्षापर्यंतच्या कालावधीत 15 हजार रुपये मिळतील. 7 ते 12 वर्षांमध्ये 1,15,386 रुपये आणि 7 वर्षांसाठी प्रिमियम भरल्यास दुसऱ्या वर्षापासून आठव्या वर्षापर्यंत  20,000 रुपये आणि आठ ते 14 वर्षांसाठी 1,18,455 रुपये इतका निर्धारित परतावा मिळेल.