देशात 44 लाखांहून अधिक करोना लस वाया, नासाडी करण्यात `हे` राज्य अव्वल
देशात 44 लाखांहून अधिक करोना लस वाया
नवी दिल्ली : कोरोना संसर्ग (Corona) रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु करण्यात आलंय. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांसाठी तर 1 मे नंतर 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण (Corona Vaccine) उपलब्ध असणार आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आपण कोरोनावर देशात 44 लाखांहून अधिक करोना लस वाया गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय.
नासाडी करणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू (Tamilnadu) अव्वल क्रमांकावर आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती उघड झाली आहे. तामिळनाडू पाठोपाठ हरियाणा (Hariyana), पंजाब (Punjab), मणिपूर(Manipur), तेलंगणा (Telngana)यांचा लस वाया जाण्यात क्रमांक लागतो. एकूण पुरवठ्यापैकी 23 टक्के लस न वापरताच वाया गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आलीय.
लस कशी होते खराब ?
लसीची एक्सपायरी डेट उलटून जाणं
लस जास्त तापमानात ठेवणं
लस अती जास्त प्रमाणात थंड केल्याने तिच्यातील द्रव्य गोठणं
लसीची कुपी फुटणं
लस हरवणं किंवा लस चोरीला जाणं
न वापरलेल्या लस परत करताना लस खराब होणं
लसीकरणाचे सत्र संपताना उघडून ठेवलेल्या कुप्या वाया जाणं
उघडलेली लस शीतपेटीतील पाण्यात पडणं
हाताळताना झालेल्या निष्काळजीपणातून लस वाया जाणं
कुपीमधून द्रव्य इंजेक्शनमध्ये न येणं