नवी दिल्ली : मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्यावर गेली आहे. पीएम मोदी हे 2354 लोकांना फॉलो करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी हे तिसऱ्या स्थानावर आहेत. २००९ मध्ये त्यांनी ट्विटरवर अकाऊंट सुरु केलं होतं. त्याच वेळी काँग्रेस नेते शशी थरूर हे देखील ट्विटरवर आले होते. पण मोदींनी सर्व नेत्यांना मागे टाकलं आहे. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे.


10 महिन्यात 1 कोटी फॉलोअर्स


सप्टेंबर 2019 मध्ये ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या 5 कोटींवर पोहोचली होती. अवघ्या 10 महिन्यात ट्विटरवर त्यांना 1 कोटी लोकांनी फॉलो केले आहे.



अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 12 कोटी लोकं फॉलो करतात. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रमांक ट्रम्प यांना 8 कोटी 37 लाख लोकं फॉलो करतात.