नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीदरम्यान भाजपच्या कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांची प्रकृती अचानक बिघडली.


रुग्णालयात दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसद भवनाच्या लायब्रेरी बिल्‍डिंगमध्ये सुरु असलेल्या पक्षाच्या संसदीय बैठकीत त्या कोसळल्या. त्यांना राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्‍टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे देखील उपस्थित होते.



कृष्णा राज या शाहजहांपूर लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. २२ फेब्रुवारी १९६७ ला जन्म झालेल्या कृष्णा राज या मुळच्या फैजाबाद जिल्ह्याची रहिवाशी आहेत. त्यांचा विवाह लखीमपूर खीरीमधील बँकेत अधिकारी असलेले वीरेंद्र कुमार राज यांच्यासोबत झाला. कृष्णाराज १९९६ ते २००७ पर्यंत त्या आमदार होत्या. २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांना १ मुलगा आणि १ मुलगी आहे.