बायकोसह नाल्यात पडला पोलीस कर्मचारी, पुढे जे घडलं ते धक्कादायक, पाहा व्हिडीओ
एक पोलिस कर्माचारी आपल्या बायकोची तब्येत खराब असल्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जात होता. तेव्हा ही घटना घडली.
मुंबई : देशाच्या अनेक भागात मान्सूनला सुरुवात झाली आहे. पाऊस सुरू झाल्याने पाणी साचण्याची समस्याही निर्माण झाल्या आहे. ज्यामुळे बऱ्याच लोकांची तारंबळ उडाली आहे. एवढेच काय तर यामुळे छोट्यामोठ्या अप्रिय घटना देखील घडू लागल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून लोकांच्या संवेदना उडाल्या आहेत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील अलीगढ शहरातील असल्याचे समोर आले आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने स्कूटरवर बसलेले जोडपे एका मोठ्या खड्यात (Manhole) पडले. परंतु नशीबाने त्यांचे प्राण वाचले आहेत.
खरंतर एक पोलिस कर्माचारी आपल्या बायकोची तब्येत खराब असल्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जात होता. तेव्हा ही घटना घडली. जी जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
रस्त्यावर पाणी तुंबल्याने त्या पोलिसाला मॅनहोल दिसला नाही. ज्यामुळे त्याने त्या तुंबलेल्या पाण्यात गाडी नेली. परंतु ते यामुळे चालक आणि त्याची बायको. दोघेही त्या नाल्यात पडले. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली आणि त्यांचे प्राण वाचवले. परंतु त्यांची गाडी मात्र त्या मॅनहोलमध्ये गेली.
या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ निवृत्त आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यावर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.