भोपाल : आई जर जन्म देऊ शकते तर ती घेऊही शकतेच, अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 15 दिवसांच्या जुडवा मुलांची आईनेच हत्या केल्याची घटना घडलीय. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय. विशेष म्हणजे या घटनेत आरोपी आईनेच मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.आणि साधारण चार दिवस तिने पोलिसांना चकमा दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुन्ना भट्टी परीसरातील कोलार कॉलनीत सपना धाकड ही महिला तिच्या कुटूंबासोबत राहते. तिने काही दिवसांपुर्वीच जुडव्या मुलांना जन्म दिला होता. जुडव्या मुलांच्या जन्मानंतर आईसह कुटूंब फारस काही खास खूश नव्हत. त्यामुळे घरात थोड नाराजीच वातावरण होतं. यादरम्यान आई मुलांना घेऊन माहेरी निघाली होती.


आई जुडव्या मुलांना घेऊन बैरसिया या तिच्या माहेरी निघाली. ती माता मंदिरहून पायी रंगमंच महल पर्यंत पोहोचली होती. या ठिकाणी तीची दोन्हीही मुलं गायब झाली होती. नंतर तिने घरी येऊन कुटूंबियांना माहिती देऊन पोलिसात तक्रार दिली.
 
सपनाने आपली 15 दिवसांची जुळी मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. या तपासात साधारण 4 दिवस तिने पोलिसांना खुप चकवा दिला. मात्र पोलिसांना आईवरच दाट संशय आला होता. त्यानुसार त्यांनी तीची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली होती. या चौकशीत तिने गुन्हा कबूल केला. 


आरोपी आईचा धक्कादायक खुलासा  
टीटी नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी चैन सिंह रघुवंशी यांनी सांगितले की, सपनाला हत्येचे कारण एकताच सगळेच अवाक झाले. तिने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या एक दिवस आधी तिचे सासू, सासरे आणि पतीसोबत भांडण झाले होते. तिचा नवरा बेरोजगार होता. आणि दीर घरखर्च सांभाळत होता. या दरम्यान तिला जुळी मुलं झाली होती.आर्थिक विवंचनेमुळे घरात रोज भांडणे व्हायची. घटनेच्या एक दिवस अगोदरही जुळ्या मुलांचे पालनपोषण कसे करायचे यावरून घरात वाद झाला होता. सासू तिला रोज टोमणे मारायची. त्यामुळे ती तणावाखाली होती.


सपना पुढे म्हणाली,तिच्या पतीचा 6 महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. तेव्हापासून पती बेरोजगार होता. कुटुंबाची जबाबदारी दीरावर होती. दीर कुटुंबाची काळजी घेत होते. आधीच एक मुलगी आहे, गरिबीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नाही, नवरा बेरोजगार आहे, अशा स्थितीत ती दोन्ही मुलांचा सांभाळ कसा करणार, असे सासरचे लोक तिला टोमणा मारत होते. 


या वादात सपनाने मोठं पाऊल उचलंत जुळ्या मुलाचं आयुष्य संपवलं. मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये ही घटना घडलीय. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलं.