`माझ्या आईला संपव मी तुझ्याशी लग्न करेन...`; मुलीनेच दिली हत्येची सुपारी, कारण हादरवणारं
Crime News Today: आईने मुलीच्या हत्येचा कट रचला मात्र, मुलीला आईचा हा प्लान समजताच तिने आईलाच संपवण्याचा प्लान रचला.
Crime News Today: आईने मुलीच्या हत्येचा कट रचला मात्र मुलीला आईचा हा प्लान समजला. तेव्हा तिनेच आईची हत्या घडवून आणली आहे. उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील ही घटना घडली आहे. यात हल्लेखोर आणि मुलीने मिळून आईची हत्या केली आहे. तसंच, मुलीने हल्लेखोरांला लग्नाचे आमिष दाखवले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 42 वर्षीय महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह शेतात फेकून दिला होता. हत्येच्या दुसऱ्या दिवशी महिलेची ओळख पटवली होती. एटा पोलिसांनी म्हटलं आहे ती, महिला एका कामानिमित्त बाहेर गेली होती. मात्र संध्याकाळपर्यंत ती परतली नाही. तिचा फोनदेखील स्विच ऑफ येत होता. तिचा शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी तिच्या पतीला सूचना मिळाली की, तीचा मृतदेह शेतात सापडला आहे.
महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समोर आले की, महिला तिच्या माहेरी राहणाऱ्या सुभाष नावाच्या व्यक्तीसोबत संबंध होते. जो अलीकडेच तुरुंगातून बाहेर आला होता. महिला तिच्या मुलीच्या प्रेमप्रकरणांमुळं वैतागली होती. त्यामुळं तिने मुलीला मारण्याची सुपारी दिली. त्यासाठी त्याला 50 हजार रुपयेदेखील दिले होती. आरोपीने सुरुवातीला महिलेच्या मुलीसोबत चर्चा केली तिला फोनदेखील घेऊन दिला. जेव्हा महिलेने मुलीला तिच्या माहेरी बोलवले तेव्हाच तिला मारण्याचा प्लान केला.
मात्र, आरोपीने महिलेचा प्लान तिच्या मुलीलाच सांगितलं. तेव्हा हुशार मुलीने आरोपीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि आईचीच हत्या करण्यास सांगितले. सुभाषने नंतर प्लान करत मुलीचे असे फोटो काढले जसं की तिच्या हत्या झाली आहे. नंतर महिलेकडे जावून तिला दाखवले. तसंच, तिच्याकडे सुपारीचे पैसे देखील मागितले. मात्र, कित्येत दिवस त्याला पैसे न मिळाल्याने त्याने तिला धमकवण्यासाठी सांगितले. त्यानंतर एकदिवस आरोपी अलकाला घेऊन अज्ञातस्थळी गेला आणि तिथे तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे तर , मुलीला ताब्यात घेण्यात आलं आहे.