पोटच्या पोराला बाइकच्या फूटरेस्टवर उभं केलं अन्...हा Video पाहून तळपायातील आग मस्तकात जाईल
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ पाहून तळपायातील आग मस्तकात जाते.
Trending Video : आजचा जमना हा सोशल मीडियाचा आहे. इथे प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करण्यात येतात. फोटो असो किंवा व्हिडीओ कोण कुठे काय अशा सगळ्या गोष्टी इथे कळतात. अगदी सेकंद सेकंदाला असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा संताप अनावर होईल. एका आईने आपल्या मुलांसोबत जे कृत्य केलं ते पाहून माता तू वैरणी असं प्रश्न तिला विचारावसं वाटतं. (mother holds helmetless boy on bike footrest video viral on Internet Trending now)
काय म्हणावं याला? मुलाच्या जीवाशी खेळ...
या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या पोटच्या मुलाच्या जीवाशी खेळताना दिसत आहे. स्टंटच्या नावाखाली असा हा प्रकार अतिशय धोकादायक आहे. आपल्या पोटच्या मुलाला थोडं जर लागलं तर आपलं जीव खालवर होतो. ही महिला तर त्या मुलाच्या जीवाशी खेळताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रात्रीच्या वेळी धावत्या बाइकवर महिलेने मुलाला बाइकच्या फूटरेस्टवर उभं केलंय. महत्त्वाच म्हणजे या दोघांनीही हेल्टेम घातलेलं नव्हतं.
रस्ते अपघातात आपण अनेकांचे जीव जाताना पाहिले आहे. अगदी न हटी दुर्घटना घडी असे सुचक बोर्ड आपण रस्त्यांवर पाहतो. रस्त्यांवरील खड्डयांमुळे वाहनांचा अपघात होतो आणि नाहक बळी जातात. असंच काहीस जर त्या बाइकस्वारसोबत झाली असते तर केवढा मोठा अनर्थ झाला असता. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफार्म X वरील Whitefield Risin वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सतर्क व्हाला. मुलांच्या जीवासोबत अशा प्रकारेचे स्टंट करु नका.