Mediclaim Insurance News : काही घटना अनेकदा एकतर आपल्याला पेचात पाडतात किंवा आपल्या विचारांना चालना देतात. अशीच एक घटना इंदुरमध्ये घडली. मुळात ही सुखद घटना नसली तरीही त्याचे परिणामस्वरुप जे काही पाहायला मिळालं ते मात्र लक्ष वेधाणारं आहे. 


नेमकं काय घडलंय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदुरमध्ये मुलगा आणि सुनेच्या निधनानंतर सासूला नुकसानभरपाईची रक्कम म्हणून 1 कोटी 31 लाख रुपये देण्यात आले आहेत. 29 वर्षीय आयुष आणि त्यांची पत्नी 28 वर्षीय श्वेता दिक्षित यांच्या मृत्यूशी हे प्रकरण जोडलं गेलं आहे. श्वेता पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजरपदी कार्यरत होती. तर, आयुष सेल्स एक्जीक्यूटिव. जवळपास तीन वर्षांपूर्वीच ते विवाहबंधनात अडकले. प्राथमिक माहितीनुसार त्यांना मुलबाळही नव्हतं. 


16 नोव्हेंबर 2016 मध्ये रात्री दीड वाजता हॉटेलमधून जेवून निघाल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान त्यांच्या वेगवान कारनं बॉम्बे रुग्णालयानजीक उभ्या असणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये या दाम्पत्याचा मृत्यू ओढावला. श्वेता आणि आयुष यांच्या निधानानंतर मृतकाची आई मालती देवी, वडील गौरीशंकर दीक्षित आणि दीर दिव्यांश दिक्षित यांनी न्यायालयाकडे दाद मागितली. ज्यानंतर आता 25 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयानं त्यांना व्याजासहित 1.31 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


सदरील प्रकरणाची सुनावणी सुरु असतानाच श्वेताचे सासरे गौरीशंकर यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. ज्यामुळं आता नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम सासू मालती देती यांच्याच खात्यात जमा करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. 


पैशांची रक्कम आणि फोडही मोठी... 


मालती देवी यांची सून श्वेताच्या निधनाप्रकरणी त्यांना 59.48 लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि त्यावर सहा वर्षांचं व्याज म्हणजेच 22.64 लाख रुपये. म्हणजेच त्यांना एकूण 82.12 लाख रुपये मिळतील. यामध्ये 19.48 लाख रुपयांची एफडी असेल. आयुषच्या निधनानंतर आता त्याच्या आईला 36.11 रुपये नुकसानभरपाई आणि सहा वर्षांचं व्याज 13.74 लाख रुपये म्हणजे एकूण 49.86 लाख रुपये मिळण्याचे निर्देश देण्यात आला आहेत. इथं 20 लाखांची रक्कम एफडीमध्ये असेल. 


हेसुद्धा वाचा : ...आणि चंद्रावरील असमान जमिनीला लँडरचा स्पर्श झाला; Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंगचा कधीही न पाहिलेला 



सासूबाईंकडे रक्कम जाण्यामागचं नेमकं कारण काय? 


मालती देवी अर्थात श्वेताच्या सासूबाई त्यांच्या सुनेवर अवलंबून नव्हत्या तरीही हिंदू विवाह कायद्यानुसार त्या सुनेच्या सुखापासून वंचित राहिल्या. इथं प्रेम, स्नेह, मार्गदर्शन अशी सर्वच नाती तुटली. त्यामुळं सुनेच्या नुकसानभरपाईची रक्कमही सासूच्याच वाट्याला जाणार आहे. सध्या देशभरात याच प्रकरणाची चर्चा सुरु आहे.