मुंबई : सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे जग फार जवळ आलं आहे. आता सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही फोटो व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. सध्या आई आणि मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलगी तिच्या आईचं लग्न लावताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती आईच्या लग्नाबद्दल अत्यंत उत्साहित दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने तिच्या आईच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून तरुणीने आपला आनंदही व्यक्त केला आहे. या मुलीने आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल लोकांना सांगितले आहे.



मुलीने पहिल्या ट्विटमध्ये आईच्या मेंदीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिची आई मेहंदी लावण्यासाठी बसलेली दिसत आहे. या फोटोसोबत मुलीने कॅप्शन लिहिले की, "आई लग्न करत आहे, यावर विश्वास बसत नाही..."



यानंतर मुलीने ट्विट केल आहे त्यात तिने तिच्या आईच्या लग्नाच्या तयारीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये मुलीने लिहिले की, 'ती सुंदर दिसत नाही का?' यानंतर मुलीने तिच्या आईच्या लग्नाची एक झलक शेअर केली आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ पाहून तुमचेही मन भरून येईल.


तरुणीने पोस्ट केलेले हे सर्व फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या पोस्टला 20 हजारांहून अधिक लाईक करण्यात आले आहेत.