Dindori Road Accident : मध्य प्रदेशात भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे भीषण अपघात झाला आहे. दिंडोरी येथील बारझार घाटात पिकअप वाहनाचे नियंत्रण सुटून उलटून 14 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत. जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिंडोरी जिल्ह्यात झालेल्या अपघातात अनेकांचा जीव गेल्याने मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमाहून परतत असताना मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. बडझर गावाजवळ हा अपघात झाला. बडझरच्या घाटात पिकअप गाडी नियंत्रणाबाहेर गेल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमी ओटीभरणाच्या कार्यक्रमला गेले होते. अपघातातील जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बडझरच्या घाटात पिकअप गाडी नियंत्रणाबाहेर पलटी झाली आणि 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे.


मृत गावकरी अमाही देवरी गावातून मांडला जिल्ह्यातील मसूर घुगरी गावात ओटीभरणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. मात्र परतत असताना त्यांची पिकअप गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि पलटी होऊन 20 फूट शेतात पडली. घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा, पोलिस अधीक्षक अखिल पटेल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जगन्नाथ मरकाम हे शाहपुरा रुग्णालयामध्ये दाखल झाले. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली.



दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिंडोरी जिल्ह्यात झालेल्या वाहन अपघातात अनेक मौल्यवान जीवांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दिवंगतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले.